आगार प्रमुख वैभव पडोळे यांची प्रसिद्धीपत्रकातून माहिती
*⚡सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील अजूनही काही बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. पडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील बसफेऱ्या उद्या सोमवारपासून सुरू करण्यात येत आहेत. या बस फेऱ्यांमध्ये सावंतवाडी ते पुणे-निगडी आंबोली मार्गे ६.४५ वाजता (शिवशाही), सावंतवाडी ते पुणे-निगडी आंबोली मार्गे ०७.१५ वाजता, सावंतवाडी ते तुळजापूर आंबोली मार्गे सकाळी ०९.०० वाजता, सावंतवाडी ते कोल्हापूर आंबोली मार्गे दुपारी १२. ३०, १.४५ , २.४५ वाजता, सावंतवाडी ते रत्नागिरी सकाळी ०७.३०, १०.०० व दुपारी १.०० वाजता, रत्नागिरी ते सावंतवाडी सकाळी ६.००, ०७.०० व सायंकाळी ५.०० वाजता, सावंतवाडी ते चिपळूण देवरुखमार्गे सकाळी ०८. ०० वाजता, कणकवली ते गडहिंग्लज सावंतवाडीमार्गे दुपारी २.०० वाजता अशा बस सोडण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील बसफेऱ्यांमध्ये सावंतवाडी-वेर्ले सकाळी ७.००, दुपारी १२.१५, सायंकाळी ४.०० वाजता, सावंतवाडी -दोडामार्ग सकाळी ०७.००, ०९.००, ११.०० वाजता, दुपारी १२.००, २.००, ४.३०, ५.१५, ६.३० वाजता, सावंतवाडी-शिरोडा सकाळी ०७.००, ०८.००, ०९.४५, ११.००, दुपारी १३.३०, ३.००, सायंकाळी ५.०० वाजता, सावंतवाडी-आंबेगाव सकाळी ०८.००, दुपारी १२.३०, सायंकाळी ५.०० वाजता, सावंतवाडी-गोठवेवाडी सकाळी ०८.००, दुपारी १.००, सायंकाळी ५.०० वाजता, सावंतवाडी-शिवापूर सकाळी ०७.३०, दुपारी १.३०, सावंतवाडी-पारपोली सकाळी ०७.३०, दुपारी १२.०० वाजता, सावंतवाडी-कुणकेश्वर कुडाळ-मालवण मार्गे दुपारी ३.४५ वाजता सावंतवाडी – मुळस दोडामार्ग-भेडशी मार्गे सायंकाळी ५.०० वाजता अशा ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्याचे पडोळे यांनी म्हटले आहे. प्रवासावेळी प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पडोळे यांनी केले आहे
