सिंधुदुर्ग जिम असोसिएशन खजिनदार शिवाजी जाधव यांची मागणी
*⚡सावंतवाडी ता.०१-:* शासनाने जिम व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा विचार करून सकाळी ७ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ८ अशी दोन वेळेत जिम उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिम असोसिएशन खजिनदार शिवाजी जाधव माध्यमांशी बोलताना शासनाकडे केली. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे जिम व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिम चालक लोकांना निरोगी ठेवण्याचे काम करत आहेत. मात्र सरकारकडून अजूनही कोणत्याही प्रकारची मदत जिम चालकांना मिळाली नाही. काही तालुक्यांमध्ये तर जिम चालकांजवळ भाडे भरण्याचेही पैसे नाही आहेत. त्यातच त्यांनी वेळेच्या बाहेर नियमांचे उल्लंघन करून जिम चालू ठेवली तर त्यांच्यावर कारवाईची भीती घातली जाते यासाठी सकाळी ७ सायंकाळी ४ अशी वेळ न देता सकाळी ७ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ८ अशी दोन वेळेत जिम उघडण्याससाठी परवानगी द्यावी,अशी मागणी त्यांनी केली. दोन बॅचमध्ये जिमला परवानगी दिल्यास जिमही व्यवस्थित चालेल व जास्त गर्दीही होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
