कंटेनर अपघातात चालक ठार

जानवलीत महामार्गाच्या डीवाईडरवर चढत कंटेनर पलटी

*⚡कणकवली दि.०२-:* गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर कणकवली तालुक्यातील जानवली पुलाजवळ हॉटेल बावरची समोर महामार्गाच्या डीवाईडर वर चढत पलटी झाल्याने कंटेनर चालक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. हा अपघात नेमका कसा घडला हे जरी समजले नसले तरी कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर डीवाईडर वर चढल्यामुळे पलटी झाला असावा अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात पलटी झालेल्या कंटेनर खाली चालक अडकल्याने चालकाचा कमरेखालील भाग अक्षरशः छिन्नविछिन्न झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कणकवली वाहतूक पोलीस संदेश आबिटकर, वैभव कोळी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावर पलटी झालेला तो कंटेनर हटविण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले .

You cannot copy content of this page