Headlines

आकेरी येथे कार रस्ता सोडून शेतात.

प्रवासी जखमी:
नियंत्रण सुटल्याने जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठी हानी टळली..

सावंतवाडी ता.२४-: जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर आकेरी येथे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्ता सोडून थेट शेतात जाऊन अपघात झाला. आज दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात कारमधील प्रवाशांना दुखापत झाली असून सुदैवाने मोठी हानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने जात होती. आकेरी परिसरात आल्यानंतर अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला जात थेट शेतात घुसली. अपघातात कारचे नुकसान झाले असून कारमधील प्रवाशांना दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. अपघाताबाबत अधिक माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे.

You cannot copy content of this page