Headlines

आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

साई तळवणेकर प्रथम; सत्यवान राऊळ द्वितीय, दीपक पाटील तृतीय

कुडाळ : आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेना कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या स्पर्धेत वार्ड क्रमांक १३ मधील साई तळवणेकर यांनी प्रथम, वार्ड क्रमांक ५ मधील सत्यवान (शार्दुल) राऊळ यांनी द्वितीय, तर वार्ड क्रमांक १३ मधील दीपक पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक राजाराम गडेकर (वार्ड क्रमांक १), तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक प्रदीप राऊळ (वार्ड क्रमांक १३) यांना मिळाला.
कुडाळ शहरात गेल्या दोन वर्षांपासून आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेनेच्या वतीने गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षण महेश राऊळ आणि रजनीकांत कदम यांनी केले.
ही स्पर्धा प्रथम वार्डनिहाय घेण्यात आली. प्रत्येक वार्डातील विजेत्यांमधून शहरस्तरावरील प्रथम तीन तसेच उत्तेजनार्थ क्रमांक निवडण्यात आले.

वार्डनिहाय विजेते पुढीलप्रमाणे :
वार्ड क्र. १ : प्रथम राजाराम गडेकर, द्वितीय संदीप जळवी, तृतीय शुभम आकेरकर.
वार्ड क्र. २ : प्रथम अरविंद मेस्त्री, द्वितीय राहुल मेस्त्री, तृतीय विष्णू कुडाळकर.
वार्ड क्र. ३ : प्रथम प्रसाद मालवणकर, द्वितीय साईनाथ नेमळेकर, तृतीय मयुरेश आळवे.
वार्ड क्र. ४ : प्रथम भूषण मठकर, द्वितीय जयराम डिगसकर, तृतीय गिरीश काणेकर.
वार्ड क्र. ५ : प्रथम सत्यवान (शार्दुल) राऊळ, द्वितीय प्रतीक राऊळ, तृतीय रुपेश कुडाळकर.
वार्ड क्र. ६ : प्रथम आबा धडाम, द्वितीय बापू सावंत, तृतीय कुणाल शिरसाट.
वार्ड क्र. ७ : प्रथम अक्षय तेंडुलकर, द्वितीय सहदेव कुडाळकर, तृतीय वैभव आजगावकर.
वार्ड क्र. ८ : प्रथम सिद्धेश सावंत, द्वितीय गोविंद सावंत, तृतीय प्रदीप परब.
वार्ड क्र. ९ : प्रथम राकेश कांदे, द्वितीय तन्मय कुणकावळेकर.
वार्ड क्र. १० : प्रथम तेजस पाटकर, द्वितीय प्रसाद माळकर, तृतीय राज गवळी.
वार्ड क्र. ११ : प्रथम विराज हार्दिक सावंत, द्वितीय नागेश राणे, तृतीय अमेय कुडाळकर.
वार्ड क्र. १२ : प्रथम गजानन कुडाळकर, द्वितीय बाळा कुडाळकर, तृतीय संजू चिंदरकर.
वार्ड क्र. १३ : प्रथम साई तळवणेकर, द्वितीय दीपक पाटील, तृतीय प्रदीप राऊळ.
वार्ड क्र. १४ : प्रथम दीपलक्ष्मी पडते, द्वितीय राजेश पडते, तृतीय हर्षवर्धन जोशी.
वार्ड क्र. १५ : प्रथम शंकर कुंभार, द्वितीय विठोबा कुंभार, तृतीय धीरज कुंभार.
वार्ड क्र. १६ : प्रथम कौस्तुभ दाभोलकर, द्वितीय समीर हलदणकर, तृतीय महेश कुंभार.
वार्ड क्र. १७ : प्रथम डॉ. सुधीर राणे, द्वितीय चेतन परब, तृतीय महादेव बोभाटे.
स्पर्धेमुळे कुडाळ शहरातील गणेशभक्तांमध्ये सजावटीच्या माध्यमातून सर्जनशीलता आणि उत्साहाला चालना मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

You cannot copy content of this page