पूरग्रस्तांना दिला मदतीतून ’आधार’

आधार ग्रुपचा सेवाभावी उपक्रम; पूरग्रस्तांनी मानले सदस्यांचे आभार

*⚡कणकवली ता.०१-:* बांद्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका साईमंदिर येथील राकेश केसरकर यांच्यासह 20 कुटुंबीयांना बसला होता. या पूरग्रस्तांना आधार गु्रप टेंबवाडीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन मदतीचा आधार दिला. यावेळी वैभव मालंडकर, नयन यादव, बाळकृष्ण यादव, दिनेश पेडणेकर, विशाल पेडणेकर, किशोर घुरसाळे, महेंद्र सावंत, विक्रांत सावंत, आतिश कांदळकर, सोमनाथ पाटगावकर, प्रथमेश परब, तुषार गोवणकर, साईनाथ वालावकर, सुहास सूर्यवंशी, महादेव चव्हाण, बबन गोळवणकर, साईप्रसाद गोळवणकर आदी उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तूंमध्ये तांदूळ, गहू, कांदे-बटाटे, मसाले, तेल, भांडी धुण्याचा साबण, कोलगेट आदी वस्तूंचा समावेश होता. ही मदत केल्याबद्दल साईभक्त राकेश केसरकर यांनी आधार गु्रपच्या सदस्यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. समाजाचे आम्ही देणे लागतो या भावनेतून आम्ही ही पूरग्रस्तांना मदत केली आहे. ही समाजसेवा करण्याचे हे निमित्त आहे. कर्ताकरिता हा परमेश्‍वर असतो. या समाजसेवेची संधी आम्हाला लाभली. यासाठी परमेश्‍वराचे मनापासून पार्थना करतो, अशी प्रतिक्रिया आधार गु्रपचे अध्यक्ष प्रथमेश परब यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page