महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चांदिवली सेवा समिती ट्रस्टचा पुढाकार
⚡बांदा दि.०१-:* बांदा इन्सुली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चांदिवली सेवा समिती ट्रस्ट यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना धान्य व मेडिकल कीटचे वाटप करण्यात आले. संपर्क अध्यक्ष सागर तुळसकर यांच्या पुढाकारातून देण्यात आले.यात तांदूळ तूरडाळ साखर चहा पावडर साबण कोलगेट मीठ तेल बिस्किटं आदी साहित्य होते.
यावेळी संपर्क अध्यक्ष सागर तुळसकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,बांदा शहर अध्यक्ष बाळा बहिरे, कुडाळ तालुका सचिव राजेश टंकसाळे, डिंगणे ग्रामपंचायत सदस्य आदेश सावंत,विभाग अध्यक्ष नाना सावंत,वेंगुर्ला तालुका सचिव आबा चिपकर,इन्सुली शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे,धाकोरे शाखाध्यक्ष निलेश मुळीक,लक्ष्मीकांत हरमलकर,संदेश करपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
