मंगेश तळवणेकर यांनी केले जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप
*⚡सावंतवाडी ता.०१-:* कारीवडे गावात १२ कुटुंबे कोरोना बाधित आढळल्याने सध्या विलगिकरणात आहेत,हे लक्षात घेत माजी जि.प.शिक्षण आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री.मंगेश तळवणेकर यांच्या कडून खारीचा वाटा म्हणून आज त्यांना साखर, तूरडाळ, वाटाणे, तेल,चहापावडर, इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.संबंधित कुटुंबायांनी याबद्दल श्री.तळवणेकरांचे आभार मानले आहेत. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष तथा ग्रा.प.सदस्य लक्ष्मण गावकर,श्री.बाळा गावकर,श्री. मनोहर गुरव,श्री.मंगेश पंधारे, अरविंद गावडे,यशवंत नाईक, भोरू जाधव,आदी उपस्थित होते. याआधीही तळवणेकर यांनी आपल्या गावाबरोबरच जिल्ह्यातील गरजूंना धान्य,मास्क,सॅनिटायजर वाटप,श्वानाना जेवण,लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या सातशे ट्रक वाल्याना दोन ट्रक धान्य,इ.अनेक उपक्रम राबवले आहेत.याबद्दल श्री.तळवणेकर तसेच श्री.विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
