Headlines

वेंगुर्ला तालुक्यात अकरा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन….

वेंगुर्ला गाडीअड्डा सार्वजनिक गणपतीचे उद्या होणार विसर्जन….

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी अकरा दिवसांच्या गणपतींचे भक्तिमय वातावरणात व जड अंतःकरणात विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी अनंत चतुर्दशी दिवशी तालुक्यातील उर्वरित गणपतींचे विसर्जन होणार आहे. यावेळी सायंकाळसह रात्री उशिरापर्यंत सर्वच ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या…. च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातही भाऊक वातावरणात गणपतीला निरोप देण्यात आला.
वेंगुर्ला नगरपरिषद व पोलीस प्रशासनामार्फत शहरात बाजारपेठ व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
वेंगुर्ला शहरातील गाडीअड्डा येथील सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी सायंकाळी 5.30 वा. नंतर विसर्जन होणार आहे. तसेच पोलीस ठाणे येथील गणपतीचे 17 व्या दिवशी विसर्जन होणार आहे.
वेंगुर्ला गाडीअड्डा याठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव कालावधीत महाराष्ट्र राज्य मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे, आ. दिपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, आ. किरण सामंत, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब, आदींसह राजकीय पक्षांच्या जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी या गणपतीचे दर्शन घेतले.

You cannot copy content of this page