ज्येष्ठ व्यापारी आनंद आळवे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक..

⚡सावंतवाडी :ता.२४-: सावंतवाडी बाजारपेठेतील ज्येष्ठ व जुने व्यापारी आनंद आळवे यांना त्यांच्या दुकानाजवळ ३६ हजार रुपये रोख रक्कम असलेले पाकीट सापडले. पाकिटातील छायाचित्राच्या आधारे त्यांनी पाकिटाच्या मूळ मालकाची ओळख पटवून त्याच्याशी संपर्क साधला आणि संपूर्ण पाकीट त्यांना परत केले.
पाकिटात मोठी रक्कम असल्याने ते परत मिळेल की नाही, याबाबत संबंधित व्यक्तीला चिंता होती. मात्र, आनंद आळवे यांनी कोणताही मोह न ठेवता प्रामाणिकपणे पाकीट मूळ मालकाच्या स्वाधीन केले. त्यांच्या या कृतीतून माणुसकी आणि प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण झाला आहे.
आळवे यांच्या या प्रामाणिकपणाचे बाजारपेठेतील व्यापारी तसेच नागरिकांकडून कौतुक होत आहे.
