Headlines

Global Maharashtra Breaking News

मळगाव येथील गोसावी घराण्याची अनोखी परंपरा

चक्क दीड दिवस नागोबाचे पूजन करून साजरी होते नागपंचमी *⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ-:* दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांचा गणपती आपल्याला माहीत आहे, मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाचे पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे.मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात गेली दोनशेहूनही अधिक वर्षे ही दीड दिवसाची…

Read Full News

विजयदुर्ग पुणे एसटी बसला अपघात

दोन प्रवासी किरकोळ जखमी *⚡देवगड ता.१३-:* पुणे शहरापासून सुमारे २५ की मी अंतरावर असलेल्या कापूरहोळ या गावानजीक रस्त्यावरील माती व रिमझिम पाऊस सुरु असताना ब्रेक मारल्यानंतर विजयदुर्ग आगाराची विजयदुर्ग पुणे ही प्रवासी फेरी घसरून नजीकच्या सखल भागात गेली व या अपघातात दोन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. घटनास्थळी रापम पुणे विभागाचे अधिकारी दाखल होऊन क्रेनच्या…

Read Full News

खाण सुरक्षा महासंचालनालयाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यानेच कळणे खाण दुर्घटना*

घुंगुरकाठी’ अध्यक्ष सतीश लळीत यांचा आरोप *⚡सिंधुदुर्गनगरी, दि.१३-:* कळणे खाणीचा बांध कोसळून २९ जुलै रोजी जो उत्पात झाला, तो काही अकस्मात झालेला नाही. ही परिस्थिती येणार, याची चुणुक २४ एप्रिल २०१९ रोजीच दिसली होती. यादिवशी खाणीच्या अंतर्भागातील एक कडा खाणीत काम करणाऱ्या पोक्लेन मशिनवर कोसळून झालेल्या अपघातात पोक्लेन चालकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता. हा अपघात…

Read Full News

शिरोडा येथे १४ ऑगस्ट रोजी जिल्हा काँग्रेसच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.१३-:* भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचा सहभाग अधोरेखित व्हावा या उद्देशाने व्यर्थ न हो बलिदान हे अभियान सूरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे महात्मा गांधी यांच्या आदेशानुसार मीठाचा सत्याग्रह ज्या ऐतिहासिक ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी स्वातंत्र्य…

Read Full News

रविवारपासून जिल्ह्यात दुकाने, उपहारगृहे, शाॕपींग माॕल्स सर्व दिवस रात्री १० पर्यंत राहणार सुरु

कोव्हीड लसीकरणाच्या दोन्ही मात्रा प्रमाणपत्र आवश्यक – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश *⚡सिंधुदुर्ग, दि.१२-:*- रविवार दि. १५ आॕगस्टपासून जिल्ह्यातील दुकाने,उपहारगृहे, माॕल्स सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु राहण्यास मुभा देण्यात येत असून काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेवून १४ दिवस पूर्ण झालेले आवश्यक राहील, असे आदेश…

Read Full News

एकता सावंत-मोर्ये हिचा भाजपकडून सत्कार

बारावी परीक्षेत जिल्ह्यात आलीय दुसरी *⚡बांदा ता.१२-:* बारावी परीक्षेत सावंतवाडी तालुक्यातून खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या व सिंधुदुर्ग जिह्यात दुसरी आलेल्या कु. एकता महादेव सावंत मोर्ये या विद्यार्थिनीचा बांदा भाजपतर्फे सत्कार करण्यात आला आहे. यावेळी भाजप मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी,भाजपयुमो जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब,तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत,शहर अध्यक्ष…

Read Full News

बहुमताने विकासकामे बिलांना मंजुरी

बांधकाम समिती सभा ओरोस-:बांधकाम समितीसमोर स्वनिधीतील कामे मंजुरीसाठी ठेवली होती का ? ज्या कामांना या समितीने मंजुरी दिली नाही त्या कामांच्या खर्चाला आम्ही का मंजुरी द्यावी , असे सांगत सदस्य प्रदीप नारकर यांनी झालेल्या कामांच्या खर्चाच्या मंजुरीच्या प्रस्तावाला सभेत आक्षेप घेतला. तर या समितीसमोर मंजुरीसाठी कामे न ठेवता ज्या नियमाखाली कामे मंजूर केली त्याच नियमाने…

Read Full News

कारवाई केलेल्या दहा अधिकारी-कर्मचारी पुन्हा सेवेत

सीईओ प्रजित नायर यांचे आदेश ओरोस-:सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील सफाई कामगार वारसांना नियुक्त्या चुकीच्या दिल्याचा ठपका ठेवून निलंबन केलेल्या त्या पाचही अधिकाऱ्यांना व बडतर्फ केलेल्या पाच कर्मचाऱ्यांना पुन्हा जिल्हा परिषद सेवेत तात्पुरते हजर करून घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी घेतला आहे. सहायक प्रशासन अधिकारी विनायक प्रमोद पिंगुळकर, आनंद गणपत राणे, मनीषा…

Read Full News

पंतप्रधानाच्या संवाद कार्यक्रमात ८० हजार बचतगट महिलांचा समावेश

ओरोस-:’आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमा अंतर्गत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील स्वयंसहाय्यता बचतगटाच्या महिलांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचतगटाच्या ८० हजार महिलांनी या संवाद कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित दर्शवीत लाभ घेतला. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्वभूमीवर केंद्र सरकारने मार्च ते ऑगस्ट २०२१ या कालावधी आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम सुरू…

Read Full News

निधी डिसेंबर पर्यंत खर्च करण्याचे नियोजन

वित्त सभापती महेंद्र चव्हाण *⚡ओरोस ता.१२-:* २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला प्राप्त होणारा निधी व स्वनिधी डिसेंबर २०२१ मध्ये खर्च होण्यासाठी नियोजन सुरू आहे. त्या अनुषंगिक विभागाच्या बैठका घेऊन आढावा घेण्यात येत आहे, अशी माहिती वित्त सभापती महेंद्र चव्हाण यांनी गुरुवारी झालेल्या वित्त समिती सभेत दिली. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीची सभा सभापती महेंद्र चव्हाण…

Read Full News

You cannot copy content of this page