एकता सावंत-मोर्ये हिचा भाजपकडून सत्कार

बारावी परीक्षेत जिल्ह्यात आलीय दुसरी

*⚡बांदा ता.१२-:* बारावी परीक्षेत सावंतवाडी तालुक्यातून खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या व सिंधुदुर्ग जिह्यात दुसरी आलेल्या कु. एकता महादेव सावंत मोर्ये या विद्यार्थिनीचा बांदा भाजपतर्फे सत्कार करण्यात आला आहे. यावेळी भाजप मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी,भाजपयुमो जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब,तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत,शहर अध्यक्ष राजा सावंत,ज्ञानेश्वर सावंत,मधूकर देसाई,प्रवीण देसाई,सागर सावंत,साईनाथ धारगळकर,आत्माराम गावडे,अक्षय परब आदी उपस्थित होते.यावेळी कु.एकता हिचे अभिनंदन करून पदाधिकाऱ्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

You cannot copy content of this page