आमदार निलेश राणे यांची शिफारस
कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ आणि मालवण तालुक्यातील ९ तलाठी कार्यालयांच्या इमारत बांधकामासाठी १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये कुडाळ तालुक्यातील गोठोस, आंब्रड, कुंदे, घोटगे, निरूखे, वर्दे आणि सिंधुदुर्गनगरी-ओरोस या सात तलाठी कार्यालयांचा समावेश आहे. मालवण तालुक्यातील किर्लोस आणि मसुरे-देऊळवाडा या दोन तलाठी कार्यालयांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
जीर्ण झालेल्या किंवा स्वतंत्र तलाठी कार्यालयाची इमारत उपलब्ध नसलेल्या ठिकाणी ही नवीन बांधकामे करण्यात येणार आहेत. हा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आला आहे.
गोठोस येथे तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासाठी २३ लाख, सिंधुदुर्गनगरी-ओरोससाठी २२ लाख आणि मसुरे-देऊळवाडा येथे तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासाठी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत. उर्वरित कार्यालयांसाठी प्रत्येकी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

