ओरोस-:’आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमा अंतर्गत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील स्वयंसहाय्यता बचतगटाच्या महिलांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचतगटाच्या ८० हजार महिलांनी या संवाद कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित दर्शवीत लाभ घेतला. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्वभूमीवर केंद्र सरकारने मार्च ते ऑगस्ट २०२१ या कालावधी आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम सुरू केला आहे. यानिमित्त १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील महिलांशी संवाद साधला. देशातील प्रत्येक राज्यातील महिला यात ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा नियोजन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बचतगट महिलांसाठी गावोगावी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हास्तरावर झालेल्या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार उपस्थित होते.
पंतप्रधानाच्या संवाद कार्यक्रमात ८० हजार बचतगट महिलांचा समावेश
