सीईओ प्रजित नायर यांचे आदेश
ओरोस-:सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील सफाई कामगार वारसांना नियुक्त्या चुकीच्या दिल्याचा ठपका ठेवून निलंबन केलेल्या त्या पाचही अधिकाऱ्यांना व बडतर्फ केलेल्या पाच कर्मचाऱ्यांना पुन्हा जिल्हा परिषद सेवेत तात्पुरते हजर करून घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी घेतला आहे. सहायक प्रशासन अधिकारी विनायक प्रमोद पिंगुळकर, आनंद गणपत राणे, मनीषा भास्कर देसाई ऊर्फ बर्डे, जगदीश राजाराम सावंत व विनय वसंत प्रभू या पाचही अधिकाऱ्यांना बदलून दिलेल्या पंचायत समितीच्या ठिकाणी व सेवेतून कमी केलेल्या पाचही कर्मचाऱ्यांना पुन्हा जि.प.च्या सेवेत अंतिम निर्णय होईपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
