शिरोडा येथे १४ ऑगस्ट रोजी जिल्हा काँग्रेसच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांची माहिती

*⚡सावंतवाडी ता.१३-:* भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचा सहभाग अधोरेखित व्हावा या उद्देशाने व्यर्थ न हो बलिदान हे अभियान सूरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे महात्मा गांधी यांच्या आदेशानुसार मीठाचा सत्याग्रह ज्या ऐतिहासिक ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी दिली. १५ ऑगस्ट २०२१ रोजी देशाच्या स्वातंत्र्याला ७४ वर्षे पूर्ण होऊन आपण ७५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहोत. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेस हा अविभाज्य घटक आहे हा इतिहास नव्या पिढी समोर आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने १ ऑगस्ट २०२० पासून २० ऑगस्ट २०२१ या कालावधीत विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. या माध्यमातून तरूणांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी, स्वातंत्र्य चळवळीचा खरा इतिहास लोकांसमोर यावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सकाळी १०.३० वाजता शिरोडा येथे कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page