Headlines

Global Maharashtra Breaking News

खास.राऊत हे मुख्यमंत्री ठाकरेंवर आम.नितेश राणेंकडून होणारी टीका थांबवतील काय ?

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा टोला *⚡कणकवली ता.१६-:* राणेंशी टक्कर देणारा नेता म्हणून स्वतःबद्दल बोलणारे खास. विनायक राऊत हे खारेपाटणच्या सीमेवर गाडीवरील भगवा झेंडा काढून सिंधुदुर्गात येत असत हा खास. विनायक राऊत यांचा इतिहास आहे. आमदार नितेश राणेंना स्वतःचे दोस्त म्हणवणारे खासदार विनायक राऊत नितेश राणेंकडून मातोश्रीवर आणि मुख्यमंत्री ठाकरेंवर होणारी कडवट टीका थांबवतील काय…

Read Full News

पंतप्रधान ग्रामसडक मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाच्या रस्त्याच्या कामांमध्ये घोटाळा

दोडामार्ग पं.स. सदस्य लक्ष्मण नाईक व भाजप पदाधिकाऱ्याचे उपोषण सूरूच *⚡दोडामार्ग ता.१६सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात पूर्ण झालेल्या तसेच सुरू असलेल्या पंतप्रधान ग्रामसडक मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाच्या रस्त्याच्या कामांत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. एकही काम नियमानुसार नाही किंवा त्याचा जनतेला फायदा नाही. केवळ ठेकेदाराना व अधिकाऱ्यांना हे रस्ते म्हणजे कुरण बनले आहेत, संबंधित कामांची चौकशी व्हावी,यासाठी…

Read Full News

कणकवली तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे बुजवा

सभापती मनोज रावराणे यांच्या बांधकाम विभागास सूचना *⚡कणकवली ता.१६-:* कणकवलीत तालुक्यात जुलै महिन्यात मोठया प्रमाणात झालेल्या पावसाने तालुक्यातील बहुतांश रस्त्याची दुरवस्था होऊन रस्ते खड्डेमय झाले आहेत. पण सध्या आता पाऊस कमी असल्याने हे खड्डे लवकारत लवकर बुजवण्यात येऊन रस्ते वाहतुकीस सुरळीत करावेत यासाठी कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांनी बांधकाम विभागाला खड्डे भरण्याच्या सूचना…

Read Full News

काजरकोंड येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या

पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद; मात्र कारण अद्याप अस्पष्ट *⚡सावंतवाडी ता.१६-:* सावंतवाडी काजरकोंड येथील विल्सन डिसोजा यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन…

Read Full News

ग्रा. प. कर्मचार्‍यांचे लाक्षणिक उपोषण आश्वासनाअंती मागे

*⚡सावंतवाडी ता.१६-:* ग्रा. प. कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्ट रोजी छेडलेले लाक्षणिक उपोषण आश्वासनाअंती मागे घेण्यात आले.ग्रा.प.कर्मचार्‍यांना सुधारीत किमान वेतन, अनुकंपतत्वावर नियुव्ती,.भविष्य निर्वाह निधी ,जिल्हा परिषदे सेवेतील वर्ग -३ व ४ ची पद भरती आदी मागण्यासांठी हे लाक्षणिक उपोषण छेङण्यात आले. ङेप्युटीव सीईओ दीपाली पाटील यांनी ग्रा. प. कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र…

Read Full News

कणकवली न.पं.पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा सन्मान

*⚡कणकवली ता.१६-:* कोरोना काळात कणकवली शहरात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी वैद्यकीय कोरोना योद्ध्यांच्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र मेहनत घेतलेल्या न.पं.पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सदडेकर , विजय राणे , अमित राणे , संजय राणे , रोहन राणे यांचा स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सवी दिवशी शाल व श्रीफळ देऊन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सत्कार केला , यावेळी सोबत उपनगराध्यक्ष…

Read Full News

पर्यावरण प्रदूषण मुक्त आणि व्यसनमुक्तीचा वागदे येथील गोपुरीवासीयांनी केला संकल्प

*⚡कणकवली ता.१६-:* स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष दिनी कणकवली नजीकच्या वागदे येथील गोपुरीवासीयांनी भारत पर्यावरण प्रदूषण मुक्त, आणि व्यसनमुक्तीचा संकल्प केला आहे अशी माहिती नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक गोपुरी आश्रमाच्या संचालिका अर्पिता मुंबरकर यांनी दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश केला. आजचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना देशाला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी अनेक देशभक्तांनी अनेक देशभक्तांनी,…

Read Full News

दळवी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालयदिन साजरा

*⚡कणकवली ता.१६-:* मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुक्टा संघटना सचिव सुभाष आठवले ,, अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग उपकेंद्र व समन्वयक, दळवी महाविद्यालय प्रभारी संचालक श्रीपाद वेलिंग हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांनी शब्दबद्ध केलेले महाविद्यालय गीत ओमकार बर्वे (सहाय्यक प्राध्यापक) यांनी गायले.प्रास्ताविक…

Read Full News

वेंगुर्ले येथे अखंड भारत संकल्प दिन साजरा

खानोली मंडल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आयोजन *⚡वेंगुर्ला ता.१६-:* खानोली मंडल राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे वेंगुर्ले येथे अखंड भारत संकल्प दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी तालुका कार्यवाह बाळासाहेब सावंत यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख वक्ते विजय वाडकर, सहकार्यवाह ओंकार मराठे, ज्येष्ठ स्वयंसेवक आत्माराम बागलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी महेश सावंत, हृषिकेश सावंत,…

Read Full News

विद्यार्थ्यांना फी मध्ये ५०% ते ६०% पर्यंत सवलत मिळावी

महाराष्ट्र स्टुडंट युनियन,सिंधुदुर्ग विभागाची नाम. उदय सामंत यांच्याकडे मागणी *⚡कणकवली ता.१६-:* महाराष्ट्र स्टुडंट युनियन,सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी आवारात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना मागील शैक्षणिक वर्षे २०२०-२१ मध्ये, विद्यार्थ्यांना फी मध्ये ५०% ते ६०% पर्यंत सवलत मिळावी. यासाठी निवेदन देण्यात आले. शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, मागील वर्षे २०२०-२१ची, जी फी आहे, ती माफ होणार नाही….

Read Full News

You cannot copy content of this page