*⚡कणकवली ता.१६-:* कोरोना काळात कणकवली शहरात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी वैद्यकीय कोरोना योद्ध्यांच्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र मेहनत घेतलेल्या न.पं.पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सदडेकर , विजय राणे , अमित राणे , संजय राणे , रोहन राणे यांचा स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सवी दिवशी शाल व श्रीफळ देऊन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सत्कार केला , यावेळी सोबत उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , गटनेते संजय कामतेकर , आरोग्य सभापती अभि मुसळे , माजी नगरसेवक बंडू गांगण , किशोर राणे , महेश दळवी , भाई साटम , राज नलावडे उपस्थित होते .
कणकवली न.पं.पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा सन्मान
