*⚡सावंतवाडी ता.१६-:* ग्रा. प. कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्ट रोजी छेडलेले लाक्षणिक उपोषण आश्वासनाअंती मागे घेण्यात आले.ग्रा.प.कर्मचार्यांना सुधारीत किमान वेतन, अनुकंपतत्वावर नियुव्ती,.भविष्य निर्वाह निधी ,जिल्हा परिषदे सेवेतील वर्ग -३ व ४ ची पद भरती आदी मागण्यासांठी हे लाक्षणिक उपोषण छेङण्यात आले. ङेप्युटीव सीईओ दीपाली पाटील यांनी ग्रा. प. कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांच्याशी चर्चा केली. ग्रा.प.कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत १७ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेत सभा घेण्यात येईल, असे आश्वासन जि.प.अध्यक्षा सौ.संजना सावंत यांचे दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव सूहास बांबार्ङेकर, हनुमान केदार ,गुरुनाथ घाङी,नरेंद्र बिङये, प्रसाद गोङे ,सूहास साटेलकर, विभागीय अध्यक्ष वैशाली नाईक, श्री.हेमंत तोङणकर,श्री.रांगणेकर उपस्थित होते
ग्रा. प. कर्मचार्यांचे लाक्षणिक उपोषण आश्वासनाअंती मागे
