पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद; मात्र कारण अद्याप अस्पष्ट
*⚡सावंतवाडी ता.१६-:* सावंतवाडी काजरकोंड येथील विल्सन डिसोजा यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली असून पुढील अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.
