*⚡कणकवली ता.१६-:* स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष दिनी कणकवली नजीकच्या वागदे येथील गोपुरीवासीयांनी भारत पर्यावरण प्रदूषण मुक्त, आणि व्यसनमुक्तीचा संकल्प केला आहे अशी माहिती नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक गोपुरी आश्रमाच्या संचालिका अर्पिता मुंबरकर यांनी दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश केला. आजचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना देशाला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी अनेक देशभक्तांनी अनेक देशभक्तांनी, क्रांतीकांनी, समाज सुधारकांनी ब्रिटिशांना घालवून देण्यासाठी केलेले प्रयत्न डोळ्यासमोर आणले पाहिजे. त्यांनी केलेला त्याग लक्षात घेतला पाहिजे आजही आपल्या देशात भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, पर्यावरण प्रदूषण , यासारखी गुलामीडे घेवून जाणारी संकटे आपले अवास्तव रूप दाखवत आहेत. आता आपल्याला या संकटातून देशाला मुक्त करण्यासाठी झटावे लागेल संकल्प करावे लागतील. म्हणूनच आज आपण सगळे मिळून स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण, आपल्या परिवाराला, समाजाला गावाला आणि देशाला पर्यावरण प्रदूषण मुक्त, व्यसनमुक्त करण्याचा संकल्प घेऊयात असे प्रतिपादन नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक गोपुरी आश्रमाच्या संचालिका अर्पिता मुंबरकर यांनी केले. तसेच यावेळी सर्व गोपुरीवासीयांनी ध्वजारोहण करून संकल्प घेतला.
पर्यावरण प्रदूषण मुक्त आणि व्यसनमुक्तीचा वागदे येथील गोपुरीवासीयांनी केला संकल्प
