दळवी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालयदिन साजरा

*⚡कणकवली ता.१६-:* मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुक्टा संघटना सचिव सुभाष आठवले ,, अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग उपकेंद्र व समन्वयक, दळवी महाविद्यालय प्रभारी संचालक श्रीपाद वेलिंग हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांनी शब्दबद्ध केलेले महाविद्यालय गीत ओमकार बर्वे (सहाय्यक प्राध्यापक) यांनी गायले.प्रास्ताविक नरेश शेटये (सहाय्यक प्राध्यापक) यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी दळवी महाविद्यालयाचा विकास व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. तसेच दळवी सरांच्या दूरदृष्टीने तसेच अथक परिश्रमाने महाविद्यालयाचा विकास झाला आहे. असेही ते म्हणाले. हेमंत महाडिक ( भूदाते, सहाय्यक प्राध्यापक) यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, “डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी अधिकाधिक वाचक ग्रंथालयाकडे यावेत यासाठी विशेष प्रयत्न केले, आज सुद्धा त्यांचे ग्रंथालयाचे सिद्धांत महत्वपूर्ण आहेत”. दळवी महाविद्यालयाचे ग्रंथपाल शुभम पोलादे यांनी डॉ. एस आर रंगनाथन यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु.अनघा घाडीगावकर हिने करून दिला. सुभाष आठवले म्हणाले, “ग्रंथालय चळवळ वाढली पाहिजे, वाचकापर्यंत ग्रंथ पोहोचले पाहिजेत, सोबतच ग्रंथाची काळजी घेणे गरजेचे आहे”. असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात श्रीपाद वेलिंग म्हणाले , “काळानुसार ग्रंथालये बदलली पाहिजेत, त्या दृष्टीने योग्य ती पाऊले उचलली गेली पाहिजेत, जेणे करून विद्यार्थी हा ग्रंथालयात यावा”. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचा विद्यार्थी निलेश खरात यांनी केले तर महाविद्यालयीन विद्यार्थीनी श्रुती वाडेकर हिने सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभम पोलादे यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page