खानोली मंडल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आयोजन
*⚡वेंगुर्ला ता.१६-:* खानोली मंडल राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे वेंगुर्ले येथे अखंड भारत संकल्प दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी तालुका कार्यवाह बाळासाहेब सावंत यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख वक्ते विजय वाडकर, सहकार्यवाह ओंकार मराठे, ज्येष्ठ स्वयंसेवक आत्माराम बागलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी महेश सावंत, हृषिकेश सावंत, नितेश पवार, सुनिल सावंत, शंकर सावंत, साहिल परब, हेरंब प्रभू, आकाश खानोलकर, तेजस खानोलकर, सुनिल घाग, संतोष धोंड, आप्पा धोंड, गुरुप्रसाद खानोलकर, राजन वेतोरकर, राजू नाईक, तेजस वेतोरकर, प्रथमेश सावंत, शाम खानोलकर यांच्यासह लहान मुलेही उपस्थित होते.
