विद्यार्थ्यांना फी मध्ये ५०% ते ६०% पर्यंत सवलत मिळावी

महाराष्ट्र स्टुडंट युनियन,सिंधुदुर्ग विभागाची नाम. उदय सामंत यांच्याकडे मागणी

*⚡कणकवली ता.१६-:* महाराष्ट्र स्टुडंट युनियन,सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी आवारात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना मागील शैक्षणिक वर्षे २०२०-२१ मध्ये, विद्यार्थ्यांना फी मध्ये ५०% ते ६०% पर्यंत सवलत मिळावी. यासाठी निवेदन देण्यात आले. शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, मागील वर्षे २०२०-२१ची, जी फी आहे, ती माफ होणार नाही. परंतु चालू शैक्षणिक वर्षे २०२१-२२ मध्ये विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देणार असल्याचे सांगितले असल्याची माहिती महाराष्ट्र स्टुडंट युनियन,सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने विभाग प्रमुख हार्दिक कदम, सदस्य प्रणय माने यांनी दिली.

You cannot copy content of this page