आरोग्य कर्मचारी, आशाताई, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कार्याचा सन्मान
*⚡सावंतवाडी ता.१६-:* स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून किनळे येथे आरोग्य उपकेंद्र तळवणे अंतर्गत कार्यरत असलेल्या कोरोना योद्ध्यांचा किनळे ग्रामपंचयतीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य कर्मचारी, आशाताई, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. आरोग्य उपकेंद्र तळवणे अंतर्गत कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी, किनळे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई आदींकडून कोरोना महामारी काळात मोठे योगदान दिले जात आहे. याची दखल घेऊन सर्व कोरोना सर्व कोरोना योद्ध्यांना सरपंच दीपक नाईक उपसरपंच वैभव सोपटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी किनळे सरपंच दीपक नाईक, उपसरपंच वैभव सोपटे, सदस्य लता मसुरकर, प्रमिला नाईक, दिव्या कोरगावकर, जयंती नाईक, शिशील डिसोझा, पोलीस पाटील इब्राहिम खान, ग्रामसेवक लातये, आरोग्य सेवक दत्ताराम गावडे, आरोग्य सेविका कविटकर व ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
