ऑनलाईन देशभक्ती गीत गायन स्पर्धेत न्हावेली शाळा नं۔ १ चे यश

*मळेवाड केंद्रबलगटाच्यावतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्पर्धेचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.१६-:* स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मळेवाड केंद्रबलगटाच्यावतीने आयोजित ऑनलाईन देशभक्ती गीत गायन स्पर्धेत दोन्ही गटात न्हावेली शाळा नं۔ १ शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला कोविड काळात शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर उंचावण्यासाठी मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे व मळेवाड केंद्र संकल्पनेनुसार मळेवाड केंद्रबल गटामध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मळेवाड केंद्रस्तरावर देशभक्ती गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती. या ऑनलाइन स्पर्धेत लहान गटात पाच तर मोठ्या गटात चार शाळा सहभागी झाल्या होत्या. विजेता संघांमध्ये लहान गटात ︎प्रथम न्हावेली शाळा नं. १, ︎द्वितीय मळेवाड शाळा शाळा नं. १, ︎तृतीय न्हावेली शाळा शाळा नं. २, ︎उत्तेजनार्थ न्हावेली शाळा शाळा नं. ४ तर मोट्या गटात ︎प्रथम न्हावेली शाळा शाळा नं. १, द्वितीय, मळेवाड शाळा शाळा नं. २, ︎तृतीय मळेवाड शाळा शाळा नं. १,.︎उत्तेजनार्थ न्हावेली शाळा शाळा नं. २ या शाळांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणातून प्राविण्य मिळविले आहे. स्पर्धेत मोठ्या गटाचे परीक्षक म्हणुन शिक्षक शुभांगी आडेलकर, गीतांजली धर्णे व सिमा राठोड यांनी काम पहिले तर लहान गटाचे परीक्षण संध्या बिबवणेकर, अर्चना रावण व विमल भावसार यांनी केले. स्पर्धाप्रमुख म्हणून न्हावेली शाळा शाळा नं. १ च्या मुख्याध्यापिका स्मिता नाईक यांनी काम पहिले. सहभागी सर्व शाळांचे, मुलांचे व शिक्षकांचे केंद्रप्रमुख म. ल. देसाई यांनी अभिनंदन केले. शैक्षणिक उपक्रमांच्या संयोजनामध्ये केंद्र मुख्याध्यापिका मंजूषा मांजरेकर, स्मिता नाईक, दिक्षा आडारकर, संतोष रावण, विशाखा कांबळी, सीमा राठोड, वामन परब, गीता धर्णे, संजय बांबुळकर व केंद्रातील सर्व शिक्षकानी सहभाग घेतला होता.

You cannot copy content of this page