असनिये येथिल युवकांनी केली तांबोळी ते असनिये रस्त्याची श्रमदानातून साफसफाई

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत सामाजिक उपक्रम

*⚡बांदा दि.१६-:* स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत असनिये येथिल युवकांनी तांबोळी ते असनिये वायगणवाडी या मुख्य रस्त्याची श्रमदानातून साफसफाई केली.तांबोळी असनिये रस्ता हा असऩिये व घारपी या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्ता असून दोडामार्गशी जोडणारा पर्यायी मार्ग आहे. त्यामुळे नेहमीच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते मात्र गेले काही महिने या रस्त्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्यामुळे हा रस्ता अपघातास आमंत्रण देत होता. मात्र स्वातंत्र्यदिनी येथील स्थानिक युवकांच्या पुढाकारातून या रस्त्याची साफसफाई करण्यात आली. यावेळी असनिये गावचे पोलिस पाटील विनायक कोलापटे यांनी श्रमदान केले.यावेळी हार्दिक सावंत, जितू जाधव,नरेश पेडणेकर,राम सावंत, भिकाजी नाईक, बुधा सावंत,गोटया सावंत,बाबुराव सावंत,संतोष सावंत,दादा सावंत, शाम भिसे,पांडुरंग सावंत,महान सावंत आधी ग्रामस्थांनी सहभागी झाले होते

You cannot copy content of this page