Headlines

शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अँड. निता सावंत-कविटकर यांनी घेतले ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन…

⚡बांदा, ता. २३-: शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत-कविटकर यांनी बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिरच्या ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने अध्यक्ष श्री. वाळके व पदाधिकाऱ्यांनी अॅड. सावंत-कविटकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अर्चना पांगम, शहरप्रमुख श्रेया गोवेकर, सावंतवाडी शहरातील पदाधिकारी सुप्रिता धारणकर, शिवानी पाटकर, ह्युमन राईट जिल्हाप्रमुख अर्चना बोंद्रे, भैया गोवेकर, राजेश विरणोडकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर अॅड. निता सावंत-कविटकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. तसेच सानिका गावडे, स्नेहा नाईक, भारती परब व कांचन जाधव यांच्या घरी विराजमान गणरायाचेही दर्शन घेतले.

सावंतवाडी शहरातील सालईवाडा, राजानगर तसेच नगरपरिषद परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देत त्यांनी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांसमवेत गणरायाचे दर्शन घेतले. या दौऱ्यात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

You cannot copy content of this page