डायमंडचे डिझाईन असलेले 575 ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञाताकडून लंपास
वेंगुर्ला
तालुक्यातील दाभोली मोबारवाडी येथे
19 लाख 72 हजार रुपयांची धाडसी चोरी बुधवारी उघडकीस आली आहे. यामध्ये डायमंडचे डिझाईन असलेले 575 ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने चोरून नेले आहेत. याबाबत सलोनी सुधीर लोलयेकर (वय-72 वर्षे, मूळ रा. दाभोली मोबारवाडी ता. वेंगुर्ला) ( सध्या रा. अंधेरी(प.) मुंबई) यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात बुधवारी फिर्याद दिली आहे.
ही चोरीची घटना दि. 18 जून दुपारी 12.30 वा. ते 21 सप्टेंबर 6 वा. या मुदतीत घडली आहे. याबाबत बुधवारी दाखल फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात वेंगुर्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाय. एन.कांबळे हे अधिक तपास करीत आहेत.
