खास.राऊत हे मुख्यमंत्री ठाकरेंवर आम.नितेश राणेंकडून होणारी टीका थांबवतील काय ?

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा टोला

*⚡कणकवली ता.१६-:* राणेंशी टक्कर देणारा नेता म्हणून स्वतःबद्दल बोलणारे खास. विनायक राऊत हे खारेपाटणच्या सीमेवर गाडीवरील भगवा झेंडा काढून सिंधुदुर्गात येत असत हा खास. विनायक राऊत यांचा इतिहास आहे. आमदार नितेश राणेंना स्वतःचे दोस्त म्हणवणारे खासदार विनायक राऊत नितेश राणेंकडून मातोश्रीवर आणि मुख्यमंत्री ठाकरेंवर होणारी कडवट टीका थांबवतील काय ? हा सवाल सिंधुदुर्गातील कट्टर शिवसैनिकांना पडला आहे, असा उपरोधिक टोला मनसे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर यांनी लगावला आहे. कणकवली मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर बोलत होते. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणत हिणवतानाच थेट मातोश्री भवन फोडण्याची भाषा नितेश राणेंनी केली. खासदार राऊत आणि आमदार नितेश यांच्या मैत्रीची बातमी जेव्हा राज्यभर पसरली, तेव्हा जुन्या शिवसैनिकांना आश्चर्य वाटले. 2005 मध्ये राणे कुटुंबियांच्या विरोधात जाऊन आम्ही शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला. 2006 च्या पोटनिवडणुकीत राणेंची शिवसेनेवर असलेली दहशत आणि बेपत्ता रमेश गोवेकर प्रकरण साऱ्या महाराष्ट्राने पाहिले. खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी राणेंवर आसूड ओढले. मात्र वेंगुर्लेतील कार्यक्रमात खासदार राऊत यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा भाजपा आमदार नितेश राणेंशी आपली मैत्री असल्याचे जगजाहीर केले. त्यानंतर आमदार नितेश राणेंनी पालकमंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत यांना सचिन वाझे म्हणत हल्लाबोल करतानाच खासदार विनायक राऊत यांची पाठराखण केली. त्यानंतर जणू शिवसेनेच्या नेत्यावर टीका केल्यासारखी सिंधुदुर्गातील शिवसेनेचे उपरे नेते किरण सामंत ची बाजू घेऊन मीडियाला सामोरे जाताहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणत हिणवतानाच थेट मातोश्री भवन फोडण्याची भाषा नितेश राणेंनी केली. खासदार राऊत आणि आमदार नितेश यांच्या मैत्रीची बातमी जेव्हा राज्यभर पसरली, तेव्हा जुन्या शिवसैनिकांना आश्चर्य वाटले. २००५ मध्ये राणे कुटुंबियांच्या विरोधात जाऊन आम्ही शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला.२००५ च्या पोटनिवडणुकीत राणेंची शिवसेनेवर असलेली दहशत आणि बेपत्ता रमेश गोवेकर प्रकरण साऱ्या महाराष्ट्राने पाहिले. खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी राणेंवर आसूड ओढले. मात्र वेंगुर्लेतील कार्यक्रमात खासदार राऊत यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा भाजपा आमदार नितेश राणेंशी आपली मैत्री असल्याचे जगजाहीर केले. त्यानंतर आमदार नितेश राणेंनी पालकमंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत यांना सचिन वाझे म्हणत हल्लाबोल करतानाच खासदार विनायक राऊत यांची पाठराखण केली. त्यानंतर जणू शिवसेनेच्या नेत्यावर टीका केल्यासारखी सिंधुदुर्गातील शिवसेनेचे उपरे नेते किरण सामंताची बाजू घेऊन मीडियाला सामोरे जाताहेत. आमदार नितेश राणेंना स्वतःचे दोस्त म्हणवणारे खासदार विनायक राऊत नितेश राणेंकडून मातोश्री वर आणि मुख्यमंत्री ठाकरेंवर होणारी कडवट टीका थांबवतील काय ? हा सवाल सिंधुदुर्गातील कट्टर शिवसैनिकांना पडला आहे, असा उपरोधिक टोला परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page