Headlines

Global Maharashtra Breaking News

‘एक वही एक पेन’ उपक्रमाला उत्तम प्रतिसाद…

⚡मालवण ता.१५-:मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिर मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त ‘एक वही-एक पेन” उपक्रमाला शहरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष वैभव वळंजू उपाध्यक्ष सागर जाधव, आयोजक समीर जाधव, कार्याध्यक्ष संजय जाधव, सचिव भरत जाधव, सदस्य सदा चुरी, बबन पवार यांच्यासह बांगीवाडा नगरिक…

Read Full News

खड्डेमय रस्त्यामुळे शेलटी ग्रामस्थ आक्रमक…

१ मे रोजी उपोषणाचा इशारा.. ⚡मालवण ता.१५-:हडी वाकडा आंबा ते शेलटी (हडी) या गेली अनेक वर्ष खड्डेमय व धोकादायक रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तात्काळ करावे. अन्यथा 1 मे रोजी उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वाकडा आंबा ते शेलटी (हडी) ग्रामीण मार्ग क्र. 225 हा रस्ता शेलटी…

Read Full News

मालवण भाजी मार्केटसमोर रस्त्यावरचे अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा…

वाहतुकीस अडथळा टाळण्यासाठी प्रशासनाची कारवाई.. ⚡मालवण ता.१५-:मालवण नगरपरिषदेच्या भाजी मार्केट इमारत समोर भाजीपाला स्टॉल व्यवसायिकानी रस्त्यावर केलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्याच्या नोटीसा मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, रचना सहाय्यक स्नेहल पाटील यांनी स्टॉल ठिकाणी जावून रस्ता व बंदिस्त गटार यांची हद्द दाखवली. त्यामागे स्टॉल न्यावेत. वाहतुकीला अडथळा निर्माण होता नये अश्या सक्त सूचना दिल्या. यावेळी…

Read Full News

आचरा ग्रामपंचायत तर्फे औषधांचे वितरण…

⚡मालवण ता.१५-:ग्रामपंचायत आचरा येथे “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेचे औचित्य साधून ग्रामपंचायतीमार्फत 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर सन – 2024/25, 2025/26 अंतर्गत आचरा आरोग्य उपकेंद्र आणि आशा सेविका यांच्यामार्फत गावातील ग्रामस्थांना वाटप करण्याकरिता अत्यंत आवश्यक औषध पुरवठा आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्या मागणीप्रमाणे आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या हस्ते…

Read Full News

मत्स्यालयासाठी आणलेला ५ कोटींचा निधी मागे गेल्याने वैभव नाईक यांचा मालवण नगरपालिका प्रशासनावर संताप…

विविध प्रश्नांवरून मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब.. ⚡मालवण ता.१५-: माजी आमदार वैभव नाईक यांनी ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांसह आज मालवण नगरपालिकेत धडक देत मालवण शहरातील प्रलंबित विकासकामे, प्रशासकीय उदासीनता आणि मत्स्यालयासाठी आलेला निधी परत गेल्याच्या मुद्द्यावरून मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांना जाब विचारत संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शहरात मत्स्यालय होण्यासाठी आणलेला सुमारे ५ कोटींचा निधी व्याजासह…

Read Full News

क्रीडा सोहळ्याने वेंगुर्ल्याच्या क्रीडा परंपरेत भर…

प्रसन्ना देसाई ;वेंगुर्ला येथील व्हॉलीबॉल स्पर्धेत मुरगुड कोल्हापूर संघ विजयी.. ⚡वेंगुर्ला ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह भरणारा ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’ अंतर्गत आयोजित भव्य राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार नुकताच वेंगुर्ला येथे पार पडला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात मुरगुड कोल्हापूर संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.भारतीय जनता पार्टी…

Read Full News

दोडामार्गात ‘साई श्रद्धा’ विशेष पुरस्कार जाहीर; २३ मान्यवरांचा होणार सन्मान…

दोडामार्ग:दोडामार्ग तालुक्यातील निर्भीड व तळागाळातील प्रश्नांवर आवाज उठवणारे पत्रकार वैभव साळकर यांना यंदा ‘साई श्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघटना, कोलझर दोडामार्ग’ यांच्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या निष्पक्ष पत्रकारितेची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.संघटनेचे अध्यक्ष सावाजी सावंत, सचिव धारिणी देसाई, उपाध्यक्ष मंदारी देसाई व संचालक मंडळाने नुकतीच याची घोषणा केली.यावर्षी…

Read Full News

सरगवे येथे तीन दिवसीय शिशु संस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡दोडामार्ग ता.१५-:सरगवे (झरे-२) येथील श्री खंडोबा देवस्थान सभागृहात विद्यादायिनी प्रतिष्ठान, दोडामार्ग यांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शिशु संस्कार शिबिराला तालुक्यातील पालक व ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिरात चित्रकला, हस्तकला, योगासने, गाणी, गोष्टी, पारंपरिक खेळ, ॐकार साधना, श्लोक-प्रार्थना तसेच विविध सर्जनशील उपक्रम घेण्यात आले. मुलांनी मोबाईलपासून दूर राहून तीन तास सलग सहभाग…

Read Full News

असलदे गावात परप्रांतीयांना जमीन विक्री विरोधात गावक-यांची एकजुट…

असलदे रामेश्वर पावणाई चव्हाटा मंदिरात एकमुखी ठराव :पर्यावरण रक्षणाबरोबरच गावाचा एकोपा राखण्यासाठी निर्णय.. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावा पाठोपाठ आता कणकवली तालुक्यातील असलदे गावात परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे. गावाच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि सांस्कृतिक , स्थानिकांचे हक्क , एकोपा राखण्याच्या संरक्षणासाठी हा एकमुखी ठराव करत निर्णय…

Read Full News

जिल्हा परिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा गाजली…

अनेक अधिकाऱ्यांना धरले धारेवर:जुन्या नव्या सदस्यांनी मांडल्या अनेक समस्या… ओरोस ता १५पहिल्याच सभेत शिक्षण, आरोग्य, रस्ते यांसह ग्रामीण भागातील असंख्य समस्यांना सभागृहात वाचा फुटली. प्रशासनाकडून लोकनियुक्त सदस्यांकडे कारभार आल्यानंतर झालेल्या पहिल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ग्रामपंचायत मालकीच्या रस्त्यांचा सर्व्हे, धोकादायक शाळा, औषध पुरवठा चौकशी असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page