प्रसन्ना देसाई ;
वेंगुर्ला येथील व्हॉलीबॉल स्पर्धेत मुरगुड कोल्हापूर संघ विजयी..
⚡वेंगुर्ला ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह भरणारा ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’ अंतर्गत आयोजित भव्य राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार नुकताच वेंगुर्ला येथे पार पडला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात मुरगुड कोल्हापूर संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग पुरस्कृत आणि जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने प्रकाशझोतातील ही भव्य स्पर्धा पार पडली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील तसेच गोवा राज्यातील १८ नामवंत संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून खेळाचा दर्जा उंचावला.वेंगुर्ल्यातील ऐतिहासिक कॅम्प मैदानावर व्हॉलीबॉलचा महासंग्राम पाहायला मिळाला. उपांत्य आणि अंतिम फेरीतील सामने अत्यंत अटीतटीचे झाले. विजेत्या संघांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक प्रणव वायंगणकर यांच्या हस्ते रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.प्रथम क्रमांक २०,००० रुपये व ( मुरगुड कोल्हापूर).
द्वितीय क्रमांक १०,००० रुपये व चषक (जय मानसीश्वर संघ वेंगुर्ला).
तृतीय क्रमांक ५,००० रुपये व चषक : (एम.सी.सी. सावंतवाडी).
चतुर्थ क्रमांक ५,००० रुपये व चषक : (ऑल आंबेशेत, रत्नागिरी) यांना गौरविण्यात आले.यावेळी
बेस्ट सेटर: हर्षवर्धन कांदळकर,
बेस्ट अटॅकर: सॅमसन फनांडिस,
इमर्जिंग प्लेयर: अमन पटेल,
प्लेयर ऑफ द टूर्नामेंट: प्रज्वल मुनकर इत्यादीना विशेष कामगिरीबाबत गौरविण्यात आले. प्रा. हेमंत गावडे, राधाकृष्ण पेडणेकर, ओंकार पोयरेकर आणि स्वराज सावंत यांनी उत्कृष्ट पंच म्हणून कामगिरी बजावली तर समालोचक सुमित मांजरेकर यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे विविध पदाधिकारी, क्रीडा प्रेमी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या क्रीडा सोहळ्याने तरुणाईमध्ये नवा उत्साह भरला असून, वेंगुर्ल्याच्या क्रीडा परंपरेत एका सुवर्ण अध्यायाची भर पडली आहे, असे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी बोलताना नमूद केले.
