Headlines

पालकमंत्री नितेश राणेंनी रोजगाराच्या नावाखाली इथल्या तरुणांची केली फसवणूक…

परशुराम उपरकर यांचा आरोप:खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं असाच प्रकार पालकमंत्र्यांकडून सुरू आहे..

⚡सावंतवाडी ता.१२-:
तळवणे येथे भूमिपूजन केलेला झोया मरीन या जहाज बांधणी कंपनीचा प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर नसल्याची माहिती मेरीटाईम बोर्ड कडून माहिती अधिकाराखाली प्राप्त झाले असून जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे रोजगाराच्या नावाखाली इथल्या तरुणांची दिशाभूल करत असल्याची टीका उबाठा सेनेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केली. मग दोन महिन्यात तीनशे लोकांना रोजगार व ट्रेनिंग कंपनी काढणार असे त्यांनी केलेली घोषणा म्हणजे भुलभुलैय्या असल्याचेही श्री. उपरकर म्हणाले. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्री उपरकर म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी 15 ऑगस्ट रोजी सावंतवाडी तालुक्यात तळवणे येथे जया मरीन या कंपनीच्या जहाज बांधणी प्रकल्पाच्या भूमिपूजन केले त्यावेळी त्यांनी दोन महिन्यात या ठिकाणी बोट तयार होणार असे घोषणा केली होती तसेच तीनशे लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आणि ट्रेनिंग कंपनी या ठिकाणी उभारणार असे म्हटले होते मात्र मुळात मेरीटाईम बोर्डाकडून या संदर्भात माहिती घेतली असता असा कुठल्याही प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी मंजूर नाही असे त्यांनी सांगितले फक्त सामंजस्य करार त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं असाच प्रकार पालकमंत्र्यांकडून सुरू आहे ज्याप्रमाणे इथे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी इथल्या बेरोजगार तरुण-तरुणींची चष्मा चा कारखाना आणणार असे सांगून फसवणूक केली होती त्याच प्रकारे जहाज बांधणी प्रकल्पाच्या नावाखाली इथल्या बेरोजगार तरुणांना फसवण्याचे काम पालकमंत्री करत आहेत.
उपरकर पुढे म्हणाले, मुळात झोया मरीन कंपनीचे भाग भांडवल हे एक लाख रुपये असताना त्या कंपनीला जिल्हा बँकेच्या माध्यमातून 120 कोटी रुपयांचे कर्ज देऊन त्यातून मलिदा खाण्याचा प्रयत्न राणे कुटुंबियांचा होता. पत्र हा प्रकल्प अध्याप का सुरू झाला नाही याचे उत्तर त्यांनी द्यावे. आता जिल्ह्यात ठिकठिकाणी पर्यटन केंद्राच्या नावाखाली नारळ फोडण्याचे काम पालकमंत्र्यांकडून सुरू आहे जिल्हा नियोजन मधून हे प्रकल्प सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण प्रत्यक्षात जिल्हा नियोजन कडेच निधी उपलब्ध नसल्यामुळे एकही प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. दुसरीकडे खासदार नारायण राणे यांनी लवकरच लवकरच मुंबई गोवा महामार्गाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण होणार असे म्हटले होते परंतु अद्याप पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही त्यामुळे एकीकडे जिल्ह्याचा विकास न करताच येथील जनतेची विकासाच्या नावाखाली फसवणूक करण्याचे काम पालकमंत्री आणि राणे कुटुंबीय करत आहेत.

You cannot copy content of this page