Headlines

मसूरे भोगलेवाडीत मध्यरात्री भीषण आग…

घरासह पाच वाहने जळून खाक..

⚡मालवण ता.१२-:
मालवण तालुक्यातील मसूरे बागायत नजिकच्या भोगलेवाडी येथील सुनील सोमा भोगले यांच्या राहत्या घराला आज मध्यरात्री भीषण आग लागली या आगीत घरासह पाच गाड्या जळून भस्मसात झाल्या असून आगीमुळे भोगले कुटुंबीयांचे लाखो रुपये नुकसान झाले आहे

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मसुरे बागायत नजिकच्या भोगलेवाडी येथे सुनील भोगले यांचे राहते घर आहे काल सुनील हे आपल्या पत्नी व मुलांबरोबर मुंबईला गेले होते त्यामुळे घरात कोणी नव्हते आज मध्यरात्री अचानक आग लागल्याने या आगीत एक क्वालिस गाडी, दोन रिक्षा, तीन स्कूटर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही स्थानिक नागरिकांनी तसेच मालवण नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाने आग आटोक्यात आणली यावेळी गस्तीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल संकेत साठे, चालक खडपकर यांचेही सहकार्य लाभले पोलीस अधिक तपास करीत आहेत

You cannot copy content of this page