मालवण दि प्रतिनिधी

ज्ञानदीप विद्यालय, वायंगणी येथील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष हनुमंत गणेश प्रभू यांच्या वतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येला स्वखर्चातून मिठाईचे वाटप करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभू यांनी विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करत त्यांना मिठाई देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी सणाचा आनंद लुटताना अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये, मोबाईलचा अतिवापर टाळावा तसेच फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाबू हडकर, मुख्याध्यापक टकले सर, जाधव सर, सौ. प्रभा हळदणकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मिठाई मिळाल्याचा आनंद दिसून येत होता. या उपक्रमाचे मुख्याध्यापक टकले सर, बाबू हडकर, जाधव सर व सौ. हळदणकर यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. प्रभा हळदणकर यांनी मानले.
