दोडामार्ग:
दोडामार्ग तालुक्यातील निर्भीड व तळागाळातील प्रश्नांवर आवाज उठवणारे पत्रकार वैभव साळकर यांना यंदा ‘साई श्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघटना, कोलझर दोडामार्ग’ यांच्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या निष्पक्ष पत्रकारितेची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
संघटनेचे अध्यक्ष सावाजी सावंत, सचिव धारिणी देसाई, उपाध्यक्ष मंदारी देसाई व संचालक मंडळाने नुकतीच याची घोषणा केली.
यावर्षी गौरव करण्यात येणाऱ्यांमध्ये वैभव साळकर (पत्रकार, दोडामार्ग), एकनाथ नाईकवर्णी, विकास कुलकर्णी, संतोष सावंत (पत्रकार, सावंतवाडी), अस्मिता भोसले (अध्यक्ष, भोसले पॉलिटेक्निक), डॉ. दिव्या गवस (दोडामार्ग), दिवाकर देसाई (सिंधुदुर्ग जिल्हा बँक सोडिओ), तातोबा वामनराव देसाई (चेअरमन, कोलझर सोसायटी व सामाजिक कार्यकर्ते तथा पोलिस पाटील), अरुण पवार (मुख्याध्यापक, जि. प. शाळा कोलझर), सुरेंद्र सावंत (सरपंच, तळकट), सागर जयसिंग राणे (सामाजिक कार्यकर्ते, रेडी), ताहिर मुजीब अहमद सनदी (इकरा कॉम्प्युटर, सावंतवाडी), साईनाथ शंकर डांगी (सामाजिक कार्यकर्ते, भेडशी) व यशोदा हरिश्चंद्र दळवी (आशा सेविका, कोलझर) यांचा समावेश आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जात असल्याचे अध्यक्ष सावाजी सावंत यांनी सांगितले.
दोडामार्गात ‘साई श्रद्धा’ विशेष पुरस्कार जाहीर; २३ मान्यवरांचा होणार सन्मान…
