सरगवे येथे तीन दिवसीय शिशु संस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡दोडामार्ग ता.१५-:
सरगवे (झरे-२) येथील श्री खंडोबा देवस्थान सभागृहात विद्यादायिनी प्रतिष्ठान, दोडामार्ग यांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शिशु संस्कार शिबिराला तालुक्यातील पालक व ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरात चित्रकला, हस्तकला, योगासने, गाणी, गोष्टी, पारंपरिक खेळ, ॐकार साधना, श्लोक-प्रार्थना तसेच विविध सर्जनशील उपक्रम घेण्यात आले. मुलांनी मोबाईलपासून दूर राहून तीन तास सलग सहभाग घेतला, हे विशेष कौतुकास्पद ठरले.
शिबिर यशस्वी पार पाडल्याबद्दल प्रतिष्ठानतर्फे पालक, बालगोपाळ, खंडोबा देवस्थान कमिटी, ग्रामस्थ व प्रशिक्षक शिक्षकांचे आभार मानण्यात आले. भविष्यातही असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

You cannot copy content of this page