Headlines

वेंगुर्ला तालुक्यात शिवसेना अधिक मजबुतीसाठी जोमाने काम करा….

श्री. संजू परब ; वेंगुर्ला तालुका शिवसेना कार्यकारिणी जाहीर !

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील आगामी कालावधीत होऊ घातलेल्या सोसायटी तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य बसविण्याचा निर्धार शिवसेना पक्षाच्या मासिक सभेत करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने तालुक्यात जास्तीत जास्त वनराई बंधारे घालण्यात येत असून उर्वरित कालावधीतही अन्य ठिकाणी बंधारे घालण्यात येणार आहेत. आगामी कालावधीत शिवसेना पक्ष जोमाने वाढविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला तालुका शिवसेना उर्वरित कार्यकारिणीची निवड यावेळी करण्यात आली.
वेंगुर्ला तालुका शिवसेना पक्षाची मासिक सभा शिवसेना सप्तसागर कॉम्प्लेक्स येथील मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, शहरप्रमुख अजित राऊळ, वेंगुर्ला पं. स.
उपसभापती सचिन देसाई, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब व सुनील मोरजकर, जिल्हा संघटक सुनील डूबळे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, युवासेना शहरप्रमुख सागर गावडे, नगरसेविका समिधा रेडकर व लीना म्हापणकर, पं.स. सदस्य साक्षी नार्वेकर व सुचिता वजराटकर, सत्यवान साटेलकर, कौशिक परब, काशिनाथ नार्वेकर, अस्मिता राऊळ, महिला आघाडी शहरप्रमुख रोहिणी लोणे, पंकज शिरसाट, उमेश नाईक तसेच अन्य तालुका, शहर पदाधिकारी, यावेळी उपस्थित होते.
शिवसेनेची कार्यकारिणी नव्याने जाहीर करण्यात आली असुन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत त्याची घोषणा करण्यात आली. यात उपतालुकाप्रमुख पदी शिरोड्याचे कौशिक परब, मठ येथील उमेश नाईक, आसोली येथील संजय गावडे, चिपी येथील भिकाजी उर्फ तात्या पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागप्रमुख पदी दत्ता साळगावकर (म्हापण) सुनिल सादजी (रेडी), संजय परब (तुळस), मितेश परब (आडेली ), शैलेश नार्वेकर (उभादांडा) यांची, उपविभागप्रमुख पदी रवी पेडणेकर (रेडी), शंकर कुडव (शिरोडा), रविंद्र केळुसकर (तुळस), नरेंद्र मोंडकर (उभादांडा) यांची निवड करण्यात आली. तालुका कार्यकारिणी सदस्यपदी अमित गावडे (शिरोडा) यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी अभिनंदन केले. वेंगुर्ला शहर तसेच तालुक्यात शिवसेना अधिक मजबूत बनविण्याचे काम सर्वांच्या सहकार्याने असेच पुढे चालू ठेवणार, असे यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी नमूद केले.

You cannot copy content of this page