‘एक वही एक पेन’ उपक्रमाला उत्तम प्रतिसाद…

⚡मालवण ता.१५-:
मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिर मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त ‘एक वही-एक पेन” उपक्रमाला शहरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष वैभव वळंजू उपाध्यक्ष सागर जाधव, आयोजक समीर जाधव, कार्याध्यक्ष संजय जाधव, सचिव भरत जाधव, सदस्य सदा चुरी, बबन पवार यांच्यासह बांगीवाडा नगरिक यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला होता. मंडळाच्यावतीने हार, मेणबत्ती, अगरबत्ती व पुष्प न देता एक वही, एक पेन देण्याचे आवाहन करण्यात आले होते. सदरची एक वही, एक पेन गरजुंना देण्यासाठी मंडळाच्यावतीने अभिनव पद्धतीने उपक्रम राबविण्यात आला होता. दिवसभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी जिल्हास्तरीय बुद्ध भीम गीते, ‘ग्रुप डान्स स्पर्धा झाली.

You cannot copy content of this page