बांदा सटमटवाडीत मृत माकड प्रकरणी पुणे प्रयोगशाळेच्या पथकाकडून गोचीडींची तपासणी सुरू…

⚡बांदा ता.१६-: बांदा सटमटवाडीत मृत माकड सापडल्याच्या पार्श्वभूमीवर आज पुणे येथील वैद्यकीय प्रयोगशाळेचे पथक तपासणीसाठी दाखल झाले होते. पीपीई किट घालून त्यांनी या परिसरातील शेकडो गोचीडी गोळा केल्या. या गोचीडी तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या. त्याचा अहवाल आठ दिवसानंतर प्राप्त होणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
गेल्या काही दिवसात मृत माकडे सापडण्याच्या घटना घडल्या आहेत तसेच 2 माकडतापाचे रुग्ण देखिल सापडले होते. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. याठिकाणी दूषित गोचीडी देखील आढळल्याने आरोग्य विभागाने सर्वेक्षण मोहीम हाती घेतली होती. आज दुपारी पुणे वैद्यकीय प्रयोगशाळेचे पथक दाखल झाले. दोन दिवसांपूर्वी ज्याठिकाणी मृत माकड सापडले होते त्या संपूर्ण परिसराची पथकाने तपासणी केली. तसेच शेकडो गोचीडी देखील गोळा केल्यात.
काल सायंकाळी उशिरा डिंगणे बांबरवाडी येथे मृत माकडाच्या शरीराचे अवशेष सापडल्याने खळबळ उडाली होती. वनविभाग व आरोग्य विभागाने या मृत माकडाच्या शरीराची विल्हेवाट लावली.

You cannot copy content of this page