Headlines

संजू परब यांनी घेतले बांदा विभागातील दुर्गामातेचे दर्शन…!

बांदा, ता. ११ : शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी बांदा विभागातील विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेट देत दुर्गामातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची आरती करून मनोभावे दर्शन घेतले.
दरम्यान, विविध नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी संजू परब यांचे स्वागत करून शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाविक उपस्थित होते.

You cannot copy content of this page