⚡मालवण ता.१५-:
ग्रामपंचायत आचरा येथे “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेचे औचित्य साधून ग्रामपंचायतीमार्फत 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर सन – 2024/25, 2025/26 अंतर्गत आचरा आरोग्य उपकेंद्र आणि आशा सेविका यांच्यामार्फत गावातील ग्रामस्थांना वाटप करण्याकरिता अत्यंत आवश्यक औषध पुरवठा आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्या मागणीप्रमाणे आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.
यावेळी उपसरपंच संतोष मिराशी
ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले, सदस्य मुजफ्फर मुजावर
पंकज आचरेकर, महेंद्र घाडी चंद्रकांत कदम ,योगेश गावकर सायली सारंग ,अनुष्का गावकर, पूर्वा तारी, हर्षदा पुजारे, श्रुती सावंत ,वरिष्ठ लिपिक नरेश परब यांसह स्थानिक ग्रामस्थ आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आदी उपस्थित होते.
