Global Maharashtra Breaking News

फोंडाघाटात तीव्र वळणावर ट्रकचा एक्सेल भररस्त्यात तुटला;

वाहतूकीचा झाला खोळंबा *⚡कणकवली ता.०२-:* फोंडाघाटातील मोठ्या तीव्र वळणावर अॅक्सल तुटल्याने रस्त्या लगतच्या संरक्षक पॅरापिट वर कोल्हापूरकडे जाणारा लेलँड मागे येऊन जोरात टेकल्याने मोठा होणारा अपघात टळला. त्याच वेळी कोल्हापूरकडे जाणारा ट्रेलर साईड घेताना गटारात रुतून पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. काल रात्रीपासून संततधार कोसळणाऱ्या पाऊस-वारा यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. पीडब्ल्यूडीचे कर्मचारी शाहू…

Read More

सुशांत नाईक उतरले जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे केला अर्ज दाखल *⚡कणकवली ता.०२-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी पतसंस्था आणि कणकवली विकास सोसायटीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे सुशांत नाईक यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. यावेळी आम.वैभव नाईक,बँक अध्यक्ष सतीश सावंत,संदेश पारकर,व्हिक्टर डाटन्स,बाबा आंगणे,मुरलीधर नाईक,समीर हडकर,बंडू ठाकूर,अशोक नांदोस्कर,भास्कर राणे,संकेत नाईक,भूषण…

Read More

कलंबिस्त येथील कॉलेज युवकाचे आकस्मित निधन…

सावंतवाडी ता.०२-:कलंबिस्त येथील एका कॉलेज युवकाचे दुःखद निधन झाले असून, गेले काही दिवस तो आजारी असल्याने त्याच्यावर गोवा येथे उपचार सुरू होते. अखेर आज उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. भिकाजी पास्ते ( वय १७) असे त्या मुलाचे नाव असून, येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल मध्ये तो इयत्ता १२ वी कॉमर्स मध्ये शिक्षण घेत होता. अत्यंत…

Read More

मळेवाड येथे ४ डिसेंबर रोजी निमंत्रितांची भजन स्पर्धा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना मळेवाड-कोंडुरे शाखेच्यावतीने आयोजन *⚡सावंतवाडी ता.०२-: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना मळेवाड-कोंडुरे शाखेच्यावतीने ४ डिसेंबर रोजी भव्य निमंत्रित भजन स्पर्धा २०२१ चे आयोजन मळेवाड जकात नाका येथे करण्यात आले आहे. या अगोदर १७ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात।आले होते. मात्र अवकाळी पावसामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती….

Read More

देसाई स्कूलमध्ये मुलांचे स्वागत

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे बुधवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोविडमुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची बंद असलेली शाळा पुन्हा १ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. मुख्याध्यापिका मनाली होडावडेकर यांच्यासह वर्गशिक्षिकांनी मुलांचे औक्षण करुन त्यांना चॉकलेट देऊन स्वागत केले. कोरोनाचे नियम पाळून शाळेमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

Read More

हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात जन आंदोलन उभारण्याची गरज ः मनोज खाडये

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* सेक्युलर भारत सरकारच्या अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणकडून प्रमाणपत्र घेतल्यावर खाजगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का? हे प्रमाणपत्र देणा-या संघटनापैकी काही संघटना आतंकवादी कारवायांमध्ये अडकलेल्या धर्माधांना सोडविण्यासाठी न्यायालयीन सहाय्य करत आहे. निधर्मी भारतात अशी धर्माधारित समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जाणे हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून शासनाने हलाल प्रमाणीकरण पद्धत तात्काळ बंद करावी…

Read More

एचआयव्ही बाधितांशी मैत्रीपूर्वक व्यवहार करा-पांडुरंग गावडे

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* आपल्या परिसरातील एचआयव्ही ग्रस्त लोकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. समाजात एड्स संबंधी असलेली गैरसमज दूर करून त्यांना शिक्षित करण्याची अत्यंत गरज आहे. एचआयव्ही बाधित लोकांशी भेदभाव न करता मैत्रीपूर्वक व्यवहार करावे असे मत प्रमुख पाहूणे डॉ. पांडुरंग गावडे यांनी व्यक्त केले. येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने जागतिक एड्स…

Read More

पावसामुळे किलबिल जल्लोष कार्यक्रम पुन्हा रद्द

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती *⚡कणकवली ता.०२-:* कणकवली शहरात 4 डिसेंबर रोजी समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला किलबिल जल्लोष कार्यक्रम पुन्हा एकदा रद्द करण्यात आला आहे. हवामान खात्याने येत्या 9 डिसेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली शहरातील लहान…

Read More

लोरे नं. १, गुरववाडी येथे श्री कुलस्वामिनी मंदिर जिर्णोद्धार सोहळा

*⚡कणकवली ता.०२-:* कणकवली तालुक्यातील, लोरे नं. १, गुरव वाडी येथे श्री कुलस्वामिनी मंदिर जिर्णोद्धार सोहळा,श्री गणेश, श्री कुलस्वामीनी आणि श्री कुलस्वामींच्या मुर्त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवार ८ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे मिराशी गुरव समाजाच्या श्री कुलस्वामीनी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आलेल्या मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि श्री. गणेश, श्री कुलस्वामीनी, श्री कुलस्वामी यांच्या मुर्त्यांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा…

Read More

रामेश्वर मंदिर परिसरातील हायमास्टचे लोकार्पण

*⚡वेंगुर्ला ता ०२-:* आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून स्थानिक आमदार विकास निधीतून वेंगुर्ला रामेश्वर मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या हायमास्टचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या ३० नोव्हेंबर रोजी रामेश्वराच्या जत्रोत्सवा दिवशी करण्यात आले. प्रारंभी शिवसेनेतर्फे हायमास्टच्या ठिकाणी श्रीफळ ठेवले. तर या सेवेबद्दल रामेश्वर देवस्थानच्या प्रथमेश गुरव यांनी गा-हाणे घातले. यावेळी तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनिल…

Read More
You cannot copy content of this page