‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमातून तिन्ही विधानसभा मतदारसंघांत दीपप्रज्वलन; जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती..
सिंधुदुर्गनगरी ता १५
सेवा संकल्प अभियान संपूर्ण देशात सुरू झालेले असून अभियान कालावधी १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ असा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा” तिन्ही विधानसभेत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.यात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एका मोठ्या प्रकल्पावर आणि प्रत्येक घरात दीप प्रज्वलित करून मोदीजीचे अभिनंदन आणि शुभेच्छा प्रदान केल्या जाणार आहेत .अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत आज दिली .
मा. केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश “सेवा, सहभाग आणि संकल्प” या तीन सूत्रांद्वारे जास्तीत जास्त नागरिकांना समाजसेवेत सहभागी करून घेणे हा आहे. याबाबत आज प्रभाकर सावंत यांनी माहिती दिली .यावेळी भाजप सरचिटणीस महेश सारंग, सोशल मिडिया सयोजक राजू परब आदि उपस्थित होते .
यावेळी बोलताना प्रभाकर सावंत म्हणाले , सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा संकल्प या अभियान अंतर्गत मंडल स्तरावर विविध उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात येणार आहेत त्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार
“आशीर्वादाचा दिवा” – या अभियानाच्या संयोजिका श्वेता कोरगावकर यांच्या नेतृत्वात तिन्ही विधानसभेतील मोदीजींनी अर्थातच भारतीय जनता पार्टीने केलेल्या प्रभावी कामाच्या प्रत्यक्ष जागेवर आशीर्वादाचा दिवा या स्वरूपात लाभार्थी व कुटुंबांशी संपर्क साधून दीपप्रज्वलन करण्यात येईल.
” चित्रकला व भाषण स्पर्धा” – या अभियानाचे संयोजक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शाळांमध्ये विकसित भारत व सेवा कार्यावर आधारित उपक्रम घेण्यात येणार आहेत .
” नमो सेवा गाथा “– वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप हे या अभियानाचे संयोजक असून त्यांच्या नियोजनात पथनाट्य व जनजागृतीच्या माध्यमातून सेवा कार्याची माहिती दिली जाणार आहे .
” आंगण का उत्सव” – या अभियानाच्या संयोजिका सौ अनुराधा नारकर यांच्या नेतृत्वात या अंतर्गत अंगणवाडी कर्मचारी आणि माता व बालकांचा सहभाग, पोषण व आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे
“कहानी बदलाव की” – सोशल मीडिया जिल्हा संयोजक श्रीकृष्ण परब यांच्या माध्यमातून विविध योजनांचे रील स्पर्धा घेऊन त्याद्वारे शासकीय योजनांमुळे झालेल्या सकारात्मक बदलांच्या लाभार्थी कथा यासंदर्भात थेट लाभार्थ्यांची भेट घेण्यात येईल आणि सरकारच्या योजनेबद्दल जनजागृती करण्यात येईल
” विकसित भारत संकल्प यात्रा व सेवा ज्योती यात्रा” – युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेत्री हे जनसहभागातून विकास व सेवा कार्याचा प्रचार रॅलीच्या माध्यमातून करतील
” जल, जन आणि सेवा संकल्प यात्रा “– जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे हे या अभियानाचे संयोजक असून त्यांचे नेतृत्वात जलसंवर्धन व विकासकामांबाबत जनजागृती केली जाणार आहे .
” सेवा मेरा योगदान – या अभियानाचे संयोजक म्हणून शिक्षण सभापती प्रितेश राऊळ हे नेतृत्व करतील प्रत्येक नागरिकाने २५ सेवा उपक्रमांपैकी कोणताही एक उपक्रम प्रत्येक विधानसभेत राबवण्यात येणार आहे
” सेवा सेतू ‘– जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी हे सेवा सेतू अभियानाचे संयोजक असून ते जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार आपल्या दारी – पात्र लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत
रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता, आरोग्य तपासणी, जलसंवर्धन, शिक्षण सहाय्य, करिअर मार्गदर्शन, नशामुक्ती, महिला आरोग्य, सायबर सुरक्षा, दिव्यांग सहाय्य, मतदार जागृती व शासकीय योजनांची माहिती अशा विविध सेवा उपक्रमांमध्ये युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग असेल अशा पद्धतीच्या भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन मतदार संघांमध्ये करण्यात आले आहे
सेवा • सहभाग • संकल्प
विकसित भारत २०४७ चा संकल्प घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा पासून सुरुवात झालेले हे अभियान १७ ऑक्टोबर पर्यंत राबवण्यात येणार असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण , खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनात भरगच्च कार्यक्रमा अंतर्गत नागरिकांपर्यंत सरकारी सेवा आणि शासकीय योजनांचा लाभ सेवा सहभाग आणि संकल्प या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्यात येईल.महिनाभर चालणारे हे अभियान यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती प्रभाकर सावंत यांनी दिली.
