Headlines

मोती तलाव परिसर नव्या विद्युत पोलने उजळला..

भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून लोकार्पण; तलाव परिसरात वाढली प्रकाशव्यवस्था..

⚡सावंतवाडी, ता. १४-: सावंतवाडी शहरातील मोती तलाव परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या विद्युत पोलचे आज भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. नव्याने बसविण्यात आलेल्या या विद्युत पोलमुळे मोती तलाव परिसर अधिक प्रकाशमय झाला असून, नागरिकांना सायंकाळच्या वेळी तलाव परिसरात फिरताना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोती तलाव हा शहराच्या सौंदर्यात भर घालणारा महत्त्वाचा परिसर असून, येथे नागरिकांची तसेच पर्यटकांची मोठी वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर परिसरातील प्रकाशव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नव्याने विद्युत पोल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे तलाव परिसराचे सौंदर्यही रात्रीच्या वेळी खुलून दिसणार आहे.

यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती मोहिनी मडगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका सविता टोपले, नगरसेविका दुलारी रांगणेकर, नगरसेवक अॅड. सिद्धार्थ भांबोरे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page