Headlines

गणेश चतुर्थीनिमित्त विशाल परब यांचा सावंतवाडीत झंझावाती दौरा…

घराघरांत विराजमान गणरायाचे घेतले मनोभावे दर्शन; नागरिकांना दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा..

सावंतवाडी, ता. १४ : गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या सावंतवाडी शहरातील झंझावाती दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शहरातील विविध भागांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला तसेच विविध कुटुंबांच्या घरी विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
गणेशोत्सवानिमित्त नागरिकांच्या घरी भेटी देऊन विशाल परब यांनी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. घराघरांत गणरायाच्या दर्शनासाठी जात असताना भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. यावेळी नागरिकांनीही त्यांचे उत्साहात स्वागत केले.
“श्री गणरायाच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदावा. प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना,” अशी भावना विशाल परब यांनी व्यक्त केली.
गणेशोत्सवाच्या काळात सावंतवाडी शहरातील विविध भागांना भेटी देऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा हा दौरा पुढेही सुरू राहणार असून, या दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

You cannot copy content of this page