Headlines

वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत पर्यावरणपूरक कृत्रिम तलाव- निर्माल्य कलश….

वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत श्री गणेश चतुर्थी सणाच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. नगरसेवकांच्या मागणीनुसार यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे गणपती मूर्ती विसर्जन योग्य पद्धतीत व्हावे यासाठी शहरातील नाल्यांमध्ये बहुसंख्य ठिकाणी प्रशासनामार्फत पाणी साठवणुकीच्या अनुषंगाने खड्डे मारण्यात आले आहेत. तसेच श्री गणेश मूर्ती विसर्जन पर्यावरणपूरक व्हावे, या दृष्टीने कृत्रिम तलावांची वेंगुर्ला पत्रापूल व साकव येथे निर्मिती करण्यात आली आहे. तसेच गणेश विसर्जन स्थळी निर्माल्य साठी निर्माल्य कलश ची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी नगरसेवक प्रीतम सावंत, नगरसेवक सुधीर पालयेकर, गणेश कांबळे, सागर चौधरी, पूर्वा मसुरकर व कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page