Headlines

वेंगुर्ला तालुक्यात 8 हजार 600 घरात होणार गणपती पूजन….

*नगरपरिषद – पोलीस यंत्रणेमार्फत
वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन..

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला तालुक्यात 8 हजार 600 घरात गणपती पूजन होणार असुन शहरात 4 ठिकाणी सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. शहरातील प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ला गाडीअड्डा येथील सार्वजनिक गणेशोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत असुन वेंगुर्ला शहरात भक्तीमय वातावरण रंगू लागले आहे. वेंगुर्ला शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शनिवारपासून तसेच आज रविवारी सकाळपासूनच श्री गणेश मूर्ती घरी नेण्यासाठी भाविकांची एकच लगबग दिसून येत होती. वेंगुर्ला शहरातील बाजारपेठेत सलग दुसऱ्या दिवशी माटवी साहित्य तसेच श्री गणेश चतुर्थी साठी लागणारे साहित्य खरेदीसाठी भाविकांची नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पीएसआय शेखर दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात वाहतूक सुरळीत करण्याचे योग्य नियोजन करण्यात आले होते. वेंगुर्ला नगर परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनानुसार शहरात टू व्हीलर पार्किंग करण्यात आले होते. दरम्यान मुख्य बाजारपेठेत अवजड वाहनांना बंदी करण्यात आल्याने वाहतूक श्री रामेश्वर मंदिर मार्गे कॅम्प हॉस्पिटल नाका कुडाळ / सावंतवाडी अशी वळविण्यात आली आहे. सोमवारी घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना होणार असून शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

You cannot copy content of this page