Headlines

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून विसर्जन घाटाचे सुशोभीकरण

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बांदा कडून स्तुत्य उपक्रम

बांदा :
बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर बांदा यांच्या वतीने गणेशभक्तांच्या सोयीसाठी तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेतून यावर्षी गणपती विसर्जन घाटाची विद्युत रोषणाई व आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले आहे. गणरायाला स्वच्छ, सुंदर आणि मंगलमय वातावरणात निरोप देता यावा, या उद्देशाने मंडळाने हा उपक्रम राबविला आहे.
या विद्युत रोषणाईचे उद्घाटन मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. मधुसूदन आळवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच विद्युत रोषणाईचा स्विच सुरू करून करण्यात आले. यावेळी उपसरपंच रत्नाकर आगलावे, पंचायत समिती सदस्य कृतिका नाईक, ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ आबा धारगळकर, राजाराम उर्फ बाळू सावंत, जावेद खतिब, साई काणेकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ भाऊ वाळके, प्रसाद वाळके, सर्वेश गोवेकर, उपाध्यक्ष निलेश उर्फ पापू कदम, खजिनदार निखिल मयेकर, सचिव गौरव नाटेकर, राकेश केसरकर, भैय्या गोवेकर, राजेश विर्नोडकर, ज्ञानेश्वर येडवे, ओंकार नाडकर्णी, प्रशांत पांगम, संजय विर्नोडकर, अर्णव स्वार, उमेश मोर्ये, शाणू पेडणेकर, साहील आगलावे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक उपक्रमांत मंडळाचा सक्रिय सहभाग
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर बांदा हे मंडळ बांदा गावात दरवर्षी विविध सामाजिक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. यावर्षी गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच मंडळाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सामाजिक जाणीवेतून विविध उपक्रम राबवून समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याचे काम मंडळाकडून केले जात आहे.
मंडळातील कार्यकर्ते विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असून, यावर्षी विसर्जन घाटाची करण्यात आलेली विद्युत रोषणाई व सुशोभीकरण हे गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
“गणरायाच्या चरणी ही सेवा समर्पित” या भावनेतून मंडळाने केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page