Headlines

कळसुलकर इंग्लिश स्कूलचे संचालक रविंद्र स्वार यांचे निधन…

⚡सावंतवाडी, ता.१५-: कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे संचालक रविंद्र स्वार (वय 76)यांचे आज निधन झाले.
त्यांच्या पार्थिव शरीर उद्या सकाळी 9.30 च्या सुमारास कोलगाव येथे आणण्यात येईल. अंत्यविधी उपरलकर स्मशान भूमीत 11 च्या सुमारास करण्यात येणार आहे.

श्री.स्वार लायन्स क्लब, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक कार्यात सक्रिय होते. उभाबाजार हनुमान मंदिर शेजारी त्यांचे आयुवेँदिक औषधांचे दुकान आहे. जयेश स्वार यांचे ते वडील होत.

You cannot copy content of this page